लोकलमध्ये महिलेचा विनयभंग आरोपीला एक दिवसांची शिक्षा

मुंबई- मुंबई लोकल ट्रेनमध्ये २०१९ साली एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ४९ वर्षीय पुरुषाला शिक्षा सुनावली आहे. आरोपीला न्यायालयाचे एक दिवसाचे कामकाज पूर्ण होईपर्यंत शिक्षा भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यासोबतच न्यायालयाने आरोपीला १००० रुपयांचा दंडही ठोठावला. आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसून, यामध्ये गोवण्यात येत असल्याचा दावा आरोपीने केला होता. न्यायालयाने त्याचा हा दावा फेटाळून लावला आहे. महिलेशी पूर्वीपासून कोणतेही वैयक्तिक वैर नसल्याच्या आरोपीच्या दाव्याचे न्यायालयाने खंडन केले.
१३ ऑगस्ट २०१९ रोजी महिला तिच्या भावासोबत पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत होती. या प्रवासादरम्यान आरोपीने तिचा विनयभंग केला. त्यानंतर महिला आणि तिच्या भावाने आरोपीला वांद्रे रेल्वे पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top