वकील गुणरत्न सदावर्तेना मोठा धक्का! एसटी बँकेतील १२ संचालकांचे राजीनामे

मुंबई- गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या संपाचे नेतृत्व केलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी महामंडळातील अस्तित्वाला फार मोठा धक्का बसला आहे.कारण त्यांच्याच पुढाकाराने एसटी महामंडळाच्या बँकेची निवडणूक लढवून जिंकलेल्या १९ पैकी १२ संचालकांनी बंड पुकारत अचानक राजीनामे दिले आहेत.या राजीनामा सत्रामुळे एसटी महामंडळात खळबळ उडाली उडाली असून सदावर्ते यांचे एसटी महामंडळातील वर्चस्व खालसा झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासुन एसटी महामंडळाच्या या बँकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप या संचालकांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी आधी कर्मचाऱ्यांचे वकीलपत्र घेतले.त्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यानंतर एसटी महामंडळाच्या निवडणुकांमध्ये आपले पॅनलही उतरवले. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने एसटी बँकेची संचालक मंडळाची निवडणूक लढवून १९ पैकी आपले १२उमेदवार निवडून आणले.मात्र,अंतर्गत कुरबुरी सुरू होऊन अखेर हे राजीनामा नाट्य घडले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top