वसईतील व्हायोलिन वादक लेस्ली मच्याडो यांचे निधन

वसई- तीन दिवसांपूर्वी एका दुचाकीच्या अपघातात जखमी झालेले वसईतील प्रसिद्ध व्हायोलिन वादक लेस्ली मच्याडो यांचा बंगली येथील कार्डिनल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.ते ६० वर्षांचे होते.
शहरातील होळी येथील कॉन्व्हेंट शाळेसमोर राहणारे लेस्ली मच्याडो हे आपल्या पत्नीसह मॉर्निंग वॉक करून आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते.त्यावेळी त्यांना वाटेत जीजी कॉलेजसमोर एका दुसर्‍या दुचाकीने धडक दिली होती.त्यात दोघेही पती पत्नी गंभीर जखमी झाले होते.त्यानंतर लेस्ली मच्याडो यांच्यावर आधी डिसूझा रुग्णालयात आणि नंतर बंगली येथील कार्डिनल रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र उपचारादरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला. रमेदी चर्च येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वसई पोलिसांनी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top