वसई-विरारमध्ये आज मॅरेथॉन! १४ हजार स्पर्धक सहभागी होणार

वसई- वसई-विरारमध्ये उद्या राष्ट्रीय स्तरावरील ११ व्या वसई-विरार महानगरपालिका मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये पुरुष- महिला धावपटूंसह सुमारे १४ हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. वसई-विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी भारताची आशियाई सुवर्णपदक विजेती धावपटू पारुल चौधरी उद्या येथे उपस्थित असणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील कालाकार देखील उपस्थित असणार आहे.
आयपीएस कृष्ण प्रकाश आणि आयपीएस विश्वास नांगरे-पाटील या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी शुक्रवारी विरार येथील न्यू विवा कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, वाहतूक विभागाकडून अधिसूचनेद्वारे शर्यतींच्या मार्गावर सकाळी ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतुकीवर निबंध घालण्यात आले आहेत. अवजड वाहनांच्या प्रवेशावरही याच कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे. वसई-विरार मॅरेथॉननिमित्ताने पश्चिम रेल्वेने रविवारी पहाटे विशेष लोकल सोडल्या होत्या. त्यामुळे या मॅरेथॉनमधील सहभागी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top