वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचा देव अवतरला!

मुंबई- मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पूर्णाकृती पुतळ्याचे आज संध्याकाळी मोठ्या दिमाखात अनावरण झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यावेळी सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह उपस्थित होता. वानखेडे स्टेडियमवर पुन्हा क्रिकेटचा देव अवतरला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कव्हर ड्राइव्ह शैलीत असलेल्या हा पुतळा तब्बल 22 फूट उंच आहे. हा पुतळा प्रसिद्ध चित्रकार-शिल्पकार प्रमोद काळे यांनी तयार केला आहे.वानखेडे स्टेडियमच्या सचिन तेंडूलकर स्टॅण्डजवळ हा पुतळा उभारण्यात आला असून भारत आणि मुंबईकडून वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट खेळताना सचिन तेंडुलकरने एकापेक्षा एक संस्मरणीय खेळी साकारल्या आहेत. विक्रमांच्या राशी रचणाऱ्या तेंडूलकरकडून कायम नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने सचिन तेंडुलकरचा पूर्णाकृती पुतळा वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात आले. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बीसीसीआयचे सचिव जय शहा, बीसीसीआय कोषाध्यक्ष आशिष शेलार, एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे उपस्थित आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top