विजापूरमध्ये सहा नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड- छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात बासागुडा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाला ६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. यामध्ये एका महिला नक्षलवाद्याचा ही समावेश आहे.
बासागुडा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत चिकुरबत्ती आणि पुसबाका गावाच्या जंगलात काही नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातला आणि नक्षलवाद्यांचा शोध सुरु केला. यावेळी लपून बसलेल्या नलक्षवाद्यांनी सुरक्षा दलांच्या पथकावर गोळीबार केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलाने केलेल्या संयुक्त कारवाईत एका महिला नक्षलवाद्यासह इतर ६ नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा दलाने या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा जप्त केला. या भागात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top