वीजबिलावर नेत्यांचे फोटो नको समाजवादी पक्षाने तक्रार केली

कोल्हापूर- महाराष्ट्र सरकार आणि महावितरण कंपनीने वीज बिलांवर राजकिय नेत्यांचे फोटो छापून उघडपणे निवडणूक आचारसंहिता भंग केला आहे,अशी तक्रार समाजवादी पार्टी महाराष्ट्रच्या वतीने कार्याध्यक्ष व ऊर्जा कार्यकर्ते प्रताप होगाडे यांनी राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातील अंदाजे २.७५ कोटीहून अधिक वीज ग्राहकांना आचारसंहिता भंग करणारी वीजबिले वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. या बिलांवर दोन्ही बाजूस राज्य सरकारची ‘सुराज्य- एक वर्ष सुराज्याचे’ असा मथळा असलेली जाहिरात छापलेली आहे.या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो छापले आहेत.तसेच सुराज्याच्या एका वर्षातील समृद्ध महाराष्ट्राचे वर्णन केले आहे.ही जाहिरात हा आचारसंहिताभंगाचा प्रकार आहे.त्यामुळे याप्रकरणी महाराष्ट्र सरकार व महावितरण कंपनी यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात यावी,अशी तक्रार समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी भारत निर्वाचन आयोग,नवी दिल्ली यांच्या पोर्टलवर आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्याकडे ईमेलद्वारे दाखल केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top