शरद पवार ८४व्या वाढदिवसानिमित्त शिरगावात ८४ फुटांचे ग्रास पेंटिंग

मुरबाड –

राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८४व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या. यासाठी शिरगाव येथे ८४ फुटांचे ग्रास पेंटिंग साकारण्यात आले. मुरबाड मधील कलावंत नंदकुमार शिंदे यांनी शाळकरी विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी हे चित्र-शिल्प साकारले.

नंदकुमार शिंदे यांनी आतपर्यंत ग्रास पेंटिंग किवा चित्रकलेचे शिक्षण घेतले नाही. मात्र, गेली २० वर्षे ते या कलेचे सादरीकरण करत आहेच आहे. शरद पवार यांना शभेच्छा देणार्या ग्रास पेंटिगमध्ये शरद पवार यांचा चेहरा गवतातून साकारण्यात आला आहे. तसेच साहेब, शतायुषी व्हा, असे लिहिलेले आहे. यासाठी आठवडाभर मेहनत घेतली. या पेंटिंग साठी५५ किलो मूग बियाणे वापरले आहे. हे पेंटिंग पहाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी वर्गासह अनेकांनी भेट देऊन शरद पवार यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top