शिलाँग-भोपाळ थेट विमान सेवा सुरू करण्याची मेघालय हायकोर्टाची मागणी

शिलाँग – मेघालयची राजधानी शिलाँगपासून मध्यप्रदेशच्या भोपाळमधील राष्ट्रीय विधी अकादमीपर्यंत जाण्यासाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी मेघालय उच्च न्यायालयाने नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाकडे केली आहे.
न्यायाधिशांना आठवड्यातून शनिवार आणि रविवार असे दोन दिवस राष्ट्रीय विधी अकादमीमध्ये प्रशिक्षण शिबिरांसाठी जावे लागते. मात्र मेघालयची राजधानी शिलाँगपासून भोपाळला जाणारी थेट विमानसेवा अस्तित्वात नाही. त्यामुळे शिलाँगहून राजधानी दिल्लीला जाऊन मग भोपाळला जावे लागते. यामध्ये वेळ आणि पैसा नाहक वाया जातो, असे न्यायाधिशांचे म्हणणे आहे.
मेघालय उच्च न्यायालयातील न्या. एस वैद्यनाथन आणि न्या. डब्ल्यू डाईंगडोह यांच्या खंडपीठाने न्यायाधिशांना भेडसावणाऱ्या समस्येची दखल घेऊन नागरी विमान उड्डाण प्रधिकरणाकडे आठवड्यातून दोन दिवस शिलाँग-भोपाळ विमान सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
शिलाँग ही मेघालयची राजधानी असूनही भोपाळ, चेन्नई, कोलकाता आणि गुवाहाटी यांसारख्या महत्वाच्या शहरांमध्ये जाण्यासाठी थेट विमानसेवा उपलब्ध नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top