‘शिवडी-न्हावाशेवा’चे सागरी पूल१२ जानेवारीला लोकार्पण?

नवी मुंबई :

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-न्हावाशेवा सागरी सेतू (एमटीएचएल) प्रकल्पाचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. सुमारे २२.७६ किमी लांबीच्या या सागरीसेतूचे लोकर्पण १२ जानेवारीला करण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याची वेळ साधण्याचा सरकारचा प्रयत्न असून तसे झाल्यास त्याच दिवशी या प्रकल्पाचे लोकार्पण होईल.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमटीएचएल, मुंबईचा कोस्टल रोड हे प्रकल्प सुरू होणे महायुती सरकारसाठी महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी १२ जानेवारीला नाशिकला येणार आहेत. हीच वेळ साधून एमटीएचएलचेही उद्घाटन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
सप्टेंबर अखेरीस या सागरी सेतूचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. नंतर डिसेंबरची डेडलाइन देण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top