शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी सेन्सेक्स व निफ्टी उच्च पातळीवर

मुंबई

भारतीय शेअर बाजारात आज ऐतिहासिक तेजी अनुभवली. आजच्या सत्रात सेन्सेक्सने ७५० हून अधिक अंकांनी वाढून ७३,४०२ चा उच्चांक नोंदवला. निफ्टीने पहिल्यांदाच २२ हजारांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर सेन्सेक्स ७५९ अंकांच्या वाढीसह ७३,३२७ वर बंद झाला. निफ्टी २०२ अंकांनी वाढून २२,०९७ वर स्थिरावला. सेन्सेक्स आज ७३,०४९ अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर तो ७३,२८८ पर्यंत वाढला.

एचसीएल टेक आणि विप्रो हे शेअर्स आज सर्वाधिक तेजीत राहिले. मेटल वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या चिन्हात बंद झाले. आयटी, पीएसयू बँक, ऑईल आणि गॅस प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. सेन्सेक्सवर विप्रो, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, मारुती, रिलायन्स, टायटन हे शेअर्स तेजीत राहिले. तसेच बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स हे शेअर्स घसरले. निफ्टीवर विप्रो, ओनजीसी, एचसीएल टेक, भारती एअरटेल आणि इन्फोसिस हे सर्वाधिक वाढले. एचडीएफसी लाईफ, बजाज फायनान्स, हिंदाल्को, बजाज फिनसर्व्ह, आयशर मोटर्स हे शेअर्स घसरले. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, रेल विकास निगम, इरकॉन इंटरनॅशनल, ज्युपिटर वॅगन्स, टिटागड रेल सिस्टीम्स आणि टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग यासारखे रेल्वे शेअर्स आजच्या व्यवहारात १९ टक्क्यांपर्यंत वाढले. आज सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया १२ पैशांनी वाढून प्रति डॉलर ८२.८२ वर पोहोचला होता. त्यानंतर भारतीय रुपया प्रति डॉलर ८२.८८ वर बंद झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top