शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी

मुंबई

भारतीय शेअर बाजारात आज सलग पाचव्या दिवशी तेजी कायम राहिली. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आज सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा उच्चांक गाठला. निफ्टी ५० ने प्रथमच २१,८०० चा आणि सेन्सेक्सने ७२,४०० चा टप्पा पार केला. सेन्सेक्स ३७१ अंकांच्या वाढीसह ७२,४१० वर बंद झाला. निफ्टी १२३ अंकांनी वाढून २१,७७८ वर स्थिरावला.

एफएमसीजी, रियल्टी, ऑईल आणि गॅस, पॉवर आणि मेटल निर्देशांक १-२ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.६६ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.२ टक्क्यांनी वाढला. दरम्यान, आज बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३६३ लाख कोटींवर पोहोचले. ते काल रोजी ३६१.३१ लाख कोटी होते. गुंतवणूकदारांना १.६९ लाख कोटींचा फायदा झाला. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्स बीएसईवर आजच्या ट्रेडमध्ये ५ टक्क्यांनी घसरून १२० रुपयांपर्यंत खाली आले. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात हे शेअर्स १२२ रुपयांवर होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top