समृद्धी’वर २०६ किमी दरम्यान ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

अपघात रोखण्यासाठी आयटीएमएस सिस्टिम

नागपूर :

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात आणि मृत्यूची संख्या बघता लवकरच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) बसवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत साधारण २०६ किलोमीटरच्या महामार्गावर ८० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी १४०० कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.

लेन कटिंग, ओव्हरस्पीड, टोलनाक्यांवरील एन्ट्री-एक्झिट आणि टोलच्या वसुलीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येईल. पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा आणि जालना जिल्ह्यांतून जाणाऱ्या २०६ किलोमीटर अंतरात ८० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्याचे लोकेशनही निश्चित केले गेले आहे. त्यामध्ये एकूण २०६ किलोमीटर अंतरावर ८० सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. औरंगाबाद ११२ किलोमीटरवर ५०, जालना ४२.५ किलोमीटरसाठी १९ आणि बुलढाण्यातील ५२.५ किलोमीटर अंतरासाठी ११ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. त्यांचे कार्यान्वयन ऑप्टिकल फायबरद्वारे करण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) मुख्यालयाकडे छत्रपती संभाजीनगर विभागाने प्रस्ताव पाठवला आहे. ही सिस्टिम सुरू करण्यासाठी २०२४ ची डेडलाइन दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top