सहारात धुळीचे वादळ आकाश केशरी झाले

अथेन्स
सहारा वाळवंटातील धुळीच्या वादळाचा फटका ग्रीकमधील अनेक शहरांना बसला. धुळीमुळे ग्रीकची राजधानी अथेन्स येथील आकाश भरदिवसा केशरी झाले. या दृष्यांचा आनंद ग्रीकमधील लोकांनी लुटला.
२०१८ नंतर आलेले हे सर्वात मोठे वादळ आहे. या वादळामुळे वातावरणावर गंभीर परिमाण झाला आहे. सहारा वाळवंटातून आलेल्या धुळीचे वारे ग्रीकमधील दक्षिणेकडील शहरे आणि अथेन्स शहरावर पसरले. त्यामुळे शहरांत धुळीचे साम्राज्य झाले. या शहरांत दृश्यमानता कमी झाले होते. या वादळामुळे श्वसनासंबंधी आजार होण्याचा धोका तज्ञांनी वर्तवला. या वादळामुळे आकाश भरदिवसा केशरी झाल्याचे दृष्ट पाहण्यासाठी ग्रीसमधील लोक घराबाहेर पडले. त्यांना आपल्या मोबाईलने फोटो देखील काढले. ग्रीसवर यापूर्वी एप्रिलच्या सुरुवातीला सहारा वाळवंटातून आलेल्या धुळीच्या वादळाचा मोठा परिणाम झाला होता. या वादळामुळे स्वित्झर्लंड आणि दक्षिण फ्रान्सच्या काही भागांवरही परिणाम झाला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top