सांगलीच्या पोस्टातून तब्बल २१९ देशांमध्ये पार्सल पाठविता येणार

सांगली – कोणतेही पार्सल सांगलीमधून जगाच्या कानाकोपऱ्यात सहज व माफक किमतीत पाठविण्याची सोय आता पोस्टामार्फत उपलब्ध झाली आहे.या पार्श्‍वभूमीवर सांगलीत मुख्य पोस्ट कार्यालयात विशेष आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग काऊंटरचे उदघाटन गोवा परिक्षेत्राचे डाक सेवा निर्देशक रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याद्वारे जगभरातील तब्बल २१९ देशात वाजवी दरात पार्सल पाठवता येणार आहे.

यावेळी डाक घर निर्यात केंद्राचा लाभ जिल्हयातील उद्योजकांनी घ्यावा व आपल्या वस्तू थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ग्राहकापर्यंत पोहोचवून आपला उद्योग लोकल ते ग्लोबल करावा. या पार्सल काऊंटरचा लाभही ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन रमेश पाटील यांनी यावेळी केले. यावेळी प्रवर अधीक्षक गुरुदास मोंडे, मिरज रेल मेल विभागाचे अधीक्षक संजय देसाई, प्रवर डाकपाल वैशाली कापसे, सहाय्यक अधीक्षक निरंजन ग्रामोपाध्ये, अनिल साळुंखे आदी उपस्थित होते.

सांगली व मिरजेतील मुख्य पोस्ट कार्यालयात हे परदेशी निर्यात केंद्र सुरू आहे.या माध्यमातून जिल्ह्यातील निर्यातदार आपल्या वस्तू परदेशात पाठवत आहेत. हे केंद्र अंतर्गत निर्यातदारांना ऑनलाइन बुकिंग, ऑनलाइन कस्टम क्लिअरन्स व डिजिटल डॉक्युमेंटेशन या सुविधा उपलब्ध करून देत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top