सांगलीच्या वारणा धरणात १८ टीएमसीच पाणीसाठा

सांगली- जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या वारणा धरणात सध्या मार्च अखेरपर्यंत फक्त १८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.अजून उन्हाळ्याचे पुढील दोन महिने बाकी असताना ही परिस्थिती उद्भवल्याने त्याकाळात तीव्र पाणीटंचाई उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिल्लक पाणी साठ्यापैकी केवळ १२ टक्के पाणीसाठा वापरण्यायोग्य आहे.
सध्या या धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून ९६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उन्हाळ्याचे आणखी दोन ते सव्वा दोन महिने बाकी आहेत. पुढील काळात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्याबरोबरच शेती आणि पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढणार आहे. त्यामुळे या धरणाच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top