सांगली रेल्वे स्थानकातून आता पहिली एक्स्प्रेस रेल्वे सुटणार

मिरज – राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस व परळी-मिरज डेमूचा सांगलीपर्यंत विस्तार करण्यात आला असून आता सांगली स्थानकातून सुटणारी राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस ही पहिलीच एक्स्प्रेस ठरली आहे. तसेच परळी-मिरज डेमूसुद्धा सांगलीतून धावणार आहे.
मिरजेतून सुटणाऱ्या राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा तब्बल २५ वर्षांनंतर सांगलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. यामुळे सांगली स्थानकाची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच या स्थानकातून एखादी एक्स्प्रेस धावणार आहे. आतापर्यंत सांगली स्थानकातून केवळ पॅसेंजर गाड्या सुटत होत्या. सांगलीजवळ १० किमी अंतरावर मिरज जंक्शन असल्याने सर्व एक्स्प्रेस मिरजेतून सोडण्यात येतात. मिरजेतून सुटणाऱ्या राणी चेन्नम्मासह इतर काही एक्स्प्रेस गाड्या कोल्हापुरात नेण्यात आल्या. मात्र जिल्ह्याचे स्थान असलेल्या सांगली स्थानकातून एकही एक्स्प्रेस नव्हती. आता राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीपर्यंत विस्तार झाल्याने सांगली स्थानकालाही एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात जागा मिळाली आहे. नवीन बदलानुसार बेंगळुरू-सांगली राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस बंगळुरूहून दररोज रात्री ९ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता मिरजेला पोहोचून १२.३० वाजता सुटेल व दुपारी सांगलीला १२.५० वाजता सांगलीत पोहोचवणार आहे.१२ मार्चपासून ही गाडी सांगलीपर्यंत सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे परळीतून सुटणारी परळी-सांगली डेमू परळी येथून सकाळी ८.१५ वाजता सुटेल आणि मिरजेला सायंकाळी ६.२० वाजता मिरजेत पोहचेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top