सातारा जिल्ह्यातील इंग्रजी पाट्या हटविण्यासाठी ८ दिवसांची नोटीस

सातारा- सहाय्यक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले यांनी सातारा शहर आणि जिल्ह्यातील इंग्रजी पाट्या असलेल्या दुकानदारांना आपल्या पाट्या हटविण्यासाठी ८ दिवसांची मुदत देत नोटीस पाठवली आहे.दरम्यान,सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने केवळ नोटीस न बजावता मराठी पाट्या लावण्यास नकार देणार्‍या दुकानदारांवर न्यायालयात खटला भरावा, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानांवरील इंग्रजी भाषेतील पाट्या बदललेल्या नाहीत.त्यामुळे आता सहाय्यक कामगार आयुक्तांनी या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुकानदारांना दंड करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांना आठ दिवसांची मुदत नोटीस देण्याची मोहीम सुरू केली आहे.त्यासाठी त्यांच्या कार्यालयातील अधिकारी दुकानांना अचानक भेटी देत आहेत.तसेच त्यांना आठ दिवसांची मुदत दिली जात आहे.दुसरीकडे मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी केवळ नोटीसा न बजावता तपासणी करून कारवाई करावी. तसेच मराठी पाट्या बदलण्यास नकार देणार्‍या दुकानदारांवर न्यायालयात खटला दाखल करण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top