सिंगापूरचे पंतप्रधानांची राजीनाम्याची घोषणा

सिंगापूर
सिंगापूरचे पंतप्रधान लि हसैन लुंग यांनी पंतप्रधान पदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय घोषित केला असून ते येत्या १५ मे रोजी ते आपल्या पदाची सूत्रे लॉरेन्स वोंग यांच्याकडे सोपवणार आहेत.
वोंग हे सध्या उपपंतप्रधानपदी असून ते सिंगापुरचे अर्थ मंत्रीही आहेत. वोंग यांचे नाव २००२ पासून पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जात होते. सिंगापूरचे पंतप्रधानांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, मी माझी पंतप्रधानपदाची भूमिका येत्या १५ मे रोजी सोडणार असून त्याचदिवशी सिंगापूरचे नवे पंतप्रधान सूत्रे स्विकारणार आहेत. लॉरेन्स वोंग आणि त्यांच्या टीमने कोरोनाकाळात लोकांचा विश्वास जिंकला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top