सिंधुदुर्ग किनारपट्टीवर ८० दुर्मीळ प्रजातींचा शोध

देवगड – ज्युनिअर सायंटिस्ट, देवगड आणि भारतीय प्राणी वैज्ञानिक संस्था, पुणे यांच्या सहकायनि कोकण कोस्टल मॅपिंग हा प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ८० दुर्मीळ समुद्रीय प्रजातींची नोंद झाली आहे. कुणकेश्वर किनारपट्टीवर सर्वाधिक ४० प्रजाती, मिठमुंबरी व मालवणमध्ये १३ तर वेंगुर्लेमध्ये ३ प्रजाती सापडल्या आहेत. या प्रजातींचे संशोधन पेपरही विद्यार्थी व प्राध्यापकांनी पूर्ण केले आहेत.
ऑक्टोबर २०२३ मध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. संशोधनात सहभागी प्राणीशास्त्र विषयाच्या विद्यार्थी व प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. दुर्मीळ प्रजाती कशा हाताळाव्यात, प्रजाती कशा ओळखाव्यात याबद्दल त्यांना सांगण्यात आले होते. या सर्वेक्षणात अतिशय दुर्मीळ तत्सम प्रजाती सापडली. वींळश्रर नावाचा दुर्मीळ खेकडा देखील सापडला. काही प्रजातींचे ठिकाणही सुरक्षित करण्यात आले. काही असुरक्षित प्रजातींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. अनेक प्रजाती प्राणी वैज्ञानिक संस्था पुणे येथे पुढील अभ्यासासाठी पाठविण्यात आल्या आहेत
[0:38 pm, 15/03/2024] Sameer: आतील पान

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top