सीईटीच्या प्रवेश परिक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

पुणे- राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल केला आहे. गेल्या काही दिवसांतील हा तिसरा बदल असून सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

नव्या वेळापत्रकानुसार एमएचटी-सीईटीतील भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र (पीसीबी) गटाची परीक्षा २२, २३, २४, २८, २९ आणि ३० एप्रिल रोजी, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र गणित (पीसीएम) गटाची परीक्षा २, ३, ४, ९, १०, ११, १५, १६, १७ मे रोजी होणार आहे. उपयोजित कला अभ्यासक्रम सीईटी १२ मे रोजी, बीए-बीएस्सी बीएड चार वर्षे एकात्मिक अभ्यासक्रम सीईटी १८ मे रोजी, पाच वर्षे विधी अभ्यासक्रमासाठीची सीईटी १८ मे, नर्सिंग सीईटी २४ आणि २५ मे, हॉटेल मॅनेजमेंट पदवी सीईटी २२ मे, बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीए सीईटी २७ ते २९ मे रोजी होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top