सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात जाणार

वॉशिंग्टन- भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स ६ मे रोजी तिसऱ्या अंतराळ यात्रेवर जाणार आहेत. बोइंगच्या स्टारलाइनर कॅलिप्सो मिशनचा त्या भाग असतील. या मोहिमेसाठी बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स या दोन ज्येष्ठ शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. सध्या सुनीता बोईंगच्या स्टारलाइनर स्पेसक्राफ्टवर क्रू फ्लाइट टेस्ट मिशन पायलट म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. बोईंगचे स्टारलाइनर अंतराळयान ६ मे रोजी रात्री १०.३४ वाजता अलायन्स ॲटलस व्ही रॉकेटने प्रक्षेपित केले जाईल. दोन्ही प्रवासी दोन आठवडे इंटरनेशनल स्पेस स्टेशनमध्ये राहतील. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top