सुनील तटकरे १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार !

दापोली

रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार हे १८ एप्रिल रोजी रायगड लोकसभा मतदारसंघातून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मतदारसंघातून सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विजयी झालेले व तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांना पराभवाचा झटका देणारे सुनील तटकरे हे शरदचंद्र पवार यांची साथ सोडून अजित पवार गटात सामील झाले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांची लढत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्याशी होणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे आमदार आणि भाजपाचे आमदार उपस्थित राहणार असल्याचे समजते. या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर तटकरे हे निवडणूक लढवीत आहेत. तर मागील निवडणुकीत शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर लढलेले माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना शिवसेना पक्षातील फुटीमुळे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे अनंत गीते यांना पुन्हा एकदा तटकरेंशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top