सॅमसंग कर्मचाऱ्यांना आठवड्यात ६ दिवस काम अनिवार्य

सेऊल-
जगप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ६ दिवस काम करणे अनिवार्य केले आहे. कंपनीच्या आर्थिक अडचणीमुळे हा निर्णय घेण्यात आला असून काही अधिकाऱ्यांनी स्वतःहून शनिवारी व रविवारीही काम करायला सुरुवात केली आहे. केवळ सॅमसंगच नव्हे तर दक्षिण कोरियाच्या इतर कंपन्यांमध्येही हेच धोरण राबवले जाण्याची शक्यता आहे.
सॅमसंगच्या सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ६ दिवस काम करावे लागेल, त्याचप्रमाणे त्यांना शनिवारी व रविवारी ओव्हरटाइम करावा लागेल असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सॅमसंग ग्रुपला अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत असून गेल्या आर्थिक वर्षात कंपनीची कामगिरी आतापर्यंतची सगळ्यात कमजोर कामगिरी होती. त्यामुळेच कंपनीला हे पाऊल उचलावे लागले. कोरियन इकॉनॉमिक डेलीच्या रिपोर्टनुसार, काही विभागांमध्ये हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला आहे. इतर ठिकाणीही लवकरच कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ६ दिवस काम करावे लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top