सॅम ऑल्टमन पुन्हा ओपनएआयचे सीईओ

लंडन
ओपनएआयने गेल्या आठवड्यात सॅम ऑल्टमनला सीईओपदावरून हटवल्यामुळे जगभरात एकच खळबळ माजली. सॅम ऑल्टमन हे ओपनएआयचे सीईओ म्हणूनच परतणार आहेत, अशी घोषणा कंपनीने आज केली. याबाबत कराराचा एका भाग म्हणून एक नवीन बोर्ड देखील तयार करत आहे. ब्रेट टेलर, लॅरी समर्स आणि ॲडम डी ऍजेलो या बोर्ड समावेश असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सॅम ऑल्टमन आणि ओपनएआयमधील मतभेद निर्माण झाले होते. त्यांच्याविरोधात ओपनएआयच्या 505 कर्मचाऱ्यांनी आवाज उठवून सामूहिक राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर ओपनआयने एका व्हिडिओ कॉलवरुन त्यांना सीईओपदावरुन हटवले होते. त्यांच्यासह ओपनएआयचे सहसंस्थापक ग्रेग ब्रॉकमन यांनाही बोर्डातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आता कंपनीने सॅम ऑल्टमन यांना पुन्हा एकदा सीईओपदी नियुक्तीसाठी करार केला. ओपनएआय कंपनीने एक्समध्ये सांगितले की, ऑल्टमन कंपनीचे सीईओ म्हणून परत येण्यास तयार आहे. ब्रेट टेलर, लॅरी समर्स आणि ॲडम डी एंजेलो या तीन प्रमुख सदस्यांसह नवीन मंडळाची स्थापना केली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top