सोने ७५ हजार रुपये तोळा चांदीही ८६ हजारांवर पोहोचली

जळगाव

सर्वसामान्यांना सोने घेणे आता आवाक्याबाहेर झाले आहे. काल एक तोळे सोन्याचा भाव ‘जीएसटीसह’ ७५ हजार १९० रुपयांवर पोहोचला, तर चांदीनेही ८६ हजार ५२० प्रतिकिलोचा टप्पा गाठला. गुढीपाडव्यादिवशी सोन्याचा दर जीएसटीसह ७३ हजार ५४२ वर (प्रतितोळा) होता. त्यात सायंकाळी एक हजायांनी वाढ होऊन सोने ७४ हजार ३६६ रुपयांवर पोचले होते. सोन्याच्या भावात महिन्याभरात ७ हजारांची वाढ झाली. सोन्यातील दरवाढीचा परिणाम मंगळवारी ग्राहकांच्या खरेदीवर दिसून आला. गुढीपाडव्याचा मुहूर्त असतानाही सोने खरेदीत निम्मी घट झाली होती. यामुळे सुवर्ण बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top