सोन्या बैल आणि पुंगनूर गायकृष्णा कृषी महोत्सवाचे आकर्षण

सातारा :

जिल्ह्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सवात देशातील सर्वात उंच आणि देखणा असा सोन्या बैल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. सोन्या बैलासह या महोत्सवात २ टनांचा रेडा व देशातील सर्वात लहान अडीच फुटांची पुंगनूर गाय लक्षवेधी ठरणार आहे.

शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती व शेतीसाठी आवश्यक साहित्य एकाच छताखाली उपलब्ध व्हावे, यासाठी कृष्णाकाठाचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (अप्पासाहेब) यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर १७ ते २१ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात देशातील सर्वात उंच आणि देखणा असा सोन्या बैल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या बैलाची किंमत तब्बल ४१ लाखाहून अधिक असून, त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. हा बैल शांत स्वभावाचा असून, त्याची देखभाल करण्यासाठी फारसा त्रास होत नाही. पण त्याचा खुराक मात्र एखाद्या पैलवानापेक्षाही जास्त आहे. हा बैल देशातील सर्वात उंच बैल असून, त्याची उंची ६.५ फूट असून लांबी ८.५ फूट आहे. दिवसातून दोन लिटर दूध, सात ते आठ अंडी, करडई तेल २०० मिली लिटर, सहा प्रकारचे खाद्य त्याला दिले जाते व दोनदा वैरण दिली जाते. या बैलाचे वासरू सव्वा लाख रुपये किमतीचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top