स्कॉच पिणारे लोक सुरक्षित आहेत त्यांना दोन ब्रँडमधील फरक कळतो

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे टिपणी

भोपाळ

स्कॉच व्हिस्की पिणारे लोक हे सुशिक्षित आणि उच्चवर्गातील आहेत, त्यांना दोन ब्रँडमधील फरक कळतो, असे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे. इंपिरियल ब्लू आणि ब्लेंडर्स प्राईड ही व्हिस्की बनवणारी कंपनी प्रेनॉर्ड रिकार्ड इंडियाने, लंडन प्राईड या व्हिस्कीची कंपनी जे. के. इंटरप्राईजच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. उच्च न्यायालयाने प्रेनॉर्ड रिकार्ड इंडियाचा हा दावा फेटाळून लावला.

जे. के. इंटरप्राईज ही कंपनी ब्लेंडर्स प्राईड आणि इंपिरिअल ब्लू या ब्रँडची नक्कल करते, असा दावा प्रेनॉर्ड रिकार्डने केला होता. ब्लेंडर्स प्राईडचे ट्रेडमार्क आणि इंपिरिअल ब्लूच्या बाटलीची नक्कल केली जात आहे, त्यातून ग्राहकांची फसवणूक होते, त्यामुळे जे. के. इंटरप्राईजच्या लंडन प्राईड या ब्रँडवर निर्बंध लादावेत, असे या दाव्यात म्हटले होते. न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी आणि न्या. प्रणय वर्मा यांनी प्रेनॉर्ड रिकार्ड या कंपनीचा दावा फेटाळला. ‘यातील दोन ब्रँड हे प्रिमियम आणि अल्ट्राप्रिमिअम प्रकारातील आहेत आणि याचे ग्राहक सुशिक्षित आहेत. हे ग्राहक ब्लेंडर्स प्राईड, इंपिरिअल ब्लू आणि लंडन प्राईड यातील फरक सहज ओळखू शकतात. त्याचबरोबर ब्लेंडर्स प्राईडच्या बाटलीच्या रचनेची हुबेहुब नक्कल लंडन प्राईडने केली आहे, असेही दिसत नाही. प्रेनॉर्ड रिकार्ड या कंपनीने ब्रँडमधील रंगसंगतीबद्दल कोणतीही नोंदणी केलेली नाही, शिवाय ब्लेंडर्स प्राईड हा ट्रेडमार्क नोंद झालेला असले तरी प्राईड हा शब्द ट्रेडमार्क म्हणून नोंद नाही’, असे न्यायालयाने यावेळी म्हटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top