‘स्वस्तिका’ नाव असल्याने उबेरने सेवा नाकारली ! आता माफी

सिडनी – ऑस्ट्रेलियात उबेर कंपनीने एका महिलेचे नाव ‘स्वस्तिका चंद्रा’ असल्याने तिला आपली फूड सेवा देण्यास नकार दिला होता. स्वस्तिका या नावामुळे आपल्या कंपनीच्या अटींचे उल्लंघन होत असल्याचे सांगत त्या महिलेला नाव बदलण्यास सांगितले होते.तसेच तिची फूड ऑर्डरही रद्द केली होती.मात्र आता याप्रकरणी कंपनीने माफी मागितली आहे.
ही घटना ऑस्ट्रेलियातील फिजीची रहिवासी असलेल्या स्वास्तिका चंद्रासोबत ऑक्टोबर २०२३ मध्ये घडली होती. मात्र उबेरने आता माफी मागत म्हटले आहे की ‘स्वस्तिक’ सारखे चिन्ह जर्मन हुकूमशहा हिटलर आणि त्याच्या नाझी पक्षाने वापरले होते.या चिन्हाला हेकेनक्रेझही संबोधले जाते. हेकेनक्रेझसारखी कट्टरतावादी विचारसरणी असल्याचे समजून स्वस्तिका चंद्राला सेवा देण्यास कंपनीने नकार दिला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top