हमासच्या राजकीय प्रमुखाच्या घरावर इस्रायलचा विमानहल्ला

जेरुसलेम :

हमासच्या राजकीय विभागाचा प्रमुख इस्माइल हानियहच्या घरावर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हल्ला केला. या घरातूनच हानियेह दहशतवादी हल्ल्यांबाबत सूचना द्यायचा. याशिवाय या घराचा वापर दहशतवादी केंद्र म्हणून केला जायचा, असा दावा इस्रायल सैन्याने केला आहे.

हमासचा राजकीय विभागाचा प्रमुख इस्माइल हानियहचे वास्तव्य सध्या कतारमध्ये आहे. मात्र, गाझात त्याचे मूळ घर आहे. यापूर्वी इस्रायल संरक्षण दलाने गाझातील अल-शिफा रुग्णालयातील शस्त्रास्त्रांचा साठा दाखवणारी एक चित्रफीत जारी केली होती. बुधवारी इस्रायली सैनिकांनी दिवसभर रुग्णालयाची झडती घेतली होती. त्याचीच ही चित्रफित असून त्यात यात रुग्णालय परिसरात शस्त्रास्त्रे, ग्रेनेड, दारुगोळ्याचा साठा जप्त करण्यात आल्याचे दिसत आहे.या चित्रफितीत इस्रायली लष्कराचे लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॉनरिकस अल-शिफा रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी करत असल्याचेही दिसत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top