हरियाणा रोडवेजच्या कर्मचाऱ्यांचा संप

चंदिगड

हरियाणा रोडवेजच्या कर्मचाऱ्यांनी एम्प्लॉईज युनियनच्या नेतृत्वाखाली मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. अंबाला येथील हरियाणा रोडवेजच्या बस चालकाच्या मारेकऱ्यांना अटक करावी व त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी हा संप पुकारला आहे. या संपामुळे बस प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यमुनानगर, चरखी दादरी, कर्नाल, सोनिपत, सिरसा, हिस्सार आणि नरनौल येथे कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. १२ व १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री राजवीर या बसचालकाची हल्ला करून हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर हल्ला झाला तेव्हा तो पार्किंग ड्युटीवर होता. या हल्ल्यात बसचालक गंभीर जखमी झाला होता. त्याला अंबाला कॅन्टोनमेंट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top