हवाई दलाचे विमान जैसलमेरमध्ये कोसळले

जैसलमेर
राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील पिथला-जाजिया गावात भारतीय हवाई दलाचे विमान कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. नियमितपणे उड्डाण करणारे हे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याची प्राथमिक अंदाज हवाई दलाच्या अधिकार्यांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनासह हवाई दलाचे अधिकारी जिल्हा मुख्यालयापासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या पिथला-जाजिया गावात पोहोचले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी विमानाला लागलेली आग आटोक्यात आणली. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी सांगितले की, हे विमान सीमावर्ती भागावर देखरेख करत होते. विमान कोसळल्यानंतर मोठी आग लागली होती. त्यामुळे हे विमान जळून खाक झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top