हिमाचलमधील सर्वात वयोवृद्ध मतदार गंगा देवींचे निधन

बिलासपूर
हिमाचल प्रदेशातील सर्वात वयोवृद्ध मतदार गंगा देवी यांचे त्यांच्या कुल्लू येथील राहत्या घरी निधन झाले.  भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नातेवाईक असलेल्या गंगा देवी 104 वर्षांच्या होत्या. नड्डा यांनी गंगा देवीच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली. 2022 च्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान गंगा देवींना निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशातील सर्वात वयोवृद्ध मतदार म्हणून गौरविले होते.
कुल्लू येथील शास्त्रीनगर येथील राहत्या घरी सोमवारी सकाळी सातच्या सुमारास गंगा देवी यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, नड्डा आणि इतर कुटुंबीय कुल्लूला पोहोचले, तेथून गंगा देवीचे पार्थिव बिलासपूरला नेण्यात आले. त्यांचे पार्थिव बिलासपूर जिल्ह्यातील ओहर येथील शितला मंदिरात ठेवण्यात आले होते. गंगा देवी यांचे धाकटे भाऊ आणि जेपी नड्डा यांचे वडील एन.नड्डा यांनी पार्थिवाला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर जेपी नड्डांनी त्यांना मुखाग्री देऊन अंत्यसंस्कार केले. त्यावेळी हिमाचल प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते जय राम ठाकूर, राज्य भाजप प्रमुख राजीव बिंदल, खासदार सिकंदर कुमार आणि अन्य भाजप नेते उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top