हीथ्रो विमानतळावर दोन विमानांची किरकोळ टक्कर! पंखांचे नुकसान

लंडन
हीथ्रो विमानतळावरील टर्मिनल ३ येथे टोईंग करताना दोन विमानांच्या पंखाची टक्कर होऊन अपघात झाला. ब्रिटिश एअरवेजच्या १२१ प्रवाशांना घेऊन जात असलेल्या विमानाची, टो केल्या जात असलेल्या व्हर्जिन अटलांटिकच्या बोईंग ७८७-९ या रिकाम्या विमानाच्या पंखाशी टक्कर झाली. यामुळे दोन्ही विमानांच्या पंखांचे नुकसान झाले.
केवळ पंखांची टक्कर होऊन प्रवाशांच्या भागाचे नुकसान न झाल्याने अपघातात कोणी जखमी झाले नाही. नंतर प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून त्यांना रवाना करण्यात आल्याचे ब्रिटिश एअरवेजने सांगितले.
प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला आपले प्राधान्य असल्याचे दोन्ही विमान कंपन्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले. अपघाताच्या कारणासंदर्भात चौकशी सुरू असल्याची माहिती दोन्ही विमानसेवा तसेच विमानतळ प्राधिकरणातर्फे देण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top