हेमंत सोरेन यांच्या पत्नी निवडणूकीच्या रिंगणात

रांची- सध्या तुरुंगात असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन गांडेय विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत.गिरिडीह जिल्ह्यातील ही जागा झामुमोचे आमदार सरफराज अहमद यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली आहे.या जागेवर येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन या गृहिणी आहेत.त्यांची शैक्षणिक पात्रता एम.टेक आणि एमबीए आहे.ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडा येथे त्यांनी शालेय शिक्षण घेतले असून त्यांनी भुवनेश्वरमधील विविध संस्थांमधून अभियांत्रिकी आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे.त्याचा राजकीय प्रवास यावर्षी ४ मार्च रोजी गिरिडीह जिल्ह्यात जेएमएमच्या ५१ व्या स्थापना दिन सोहळ्याने सुरू झाला.याठिकाणी त्यांनी एका कार्यक्रमाला संबोधित केले होते.यामध्ये त्यांनी दावा केला होता की, २०२१ मध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांनी एक कट रचला होता.यानंतर रांची येथील इंडिया आघाडीच्या मेळाव्यातही त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top