हैदराबादमध्ये १२५ वर्षांच्या महाकाय कासवाचा मृत्यू

हैदराबाद- हैदराबादमधील नेहरू प्राणिसंग्रहालयात १२५ वर्षांच्या गॅलापागोस महाकाय कासवाचा काल मृत्यू झाला. वयाशी संबंधित आजारांमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत प्राणी संग्रहालयाने एक पत्रक प्रसिध्द करत माहिती दिली आहे. पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, गॅलापागोस महाकाय कासवाचा वृध्दापकाळामुळे मृत्यू झाला. गेल्या १० दिवसांपासून तो अन्न खात नव्हता. प्राणिसंग्रहालयातील पशुवैद्यकीय पथक त्याच्यावर उपचार करत होते. कासवाचे शवविच्छेदन करण्यात आले असून प्राथमिक अहवालानुसार कासवाच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपासासाठी व्हीबीआरआय आणि पशुवैद्यकीय महाविद्यालय, राजेंद्रनगर येथे नमुने पाठविण्यात आले.
गॅलापागोस कासव प्राणीसंग्रहालयातील सर्वात जुन्या प्राण्यांपैकी एक होते. १९६३ साली हे कासव शहरातील सार्वजनिक उद्यानातून प्राणिसंग्रहालयात स्थलांतरित करण्यात आले होते. गॅलापागोस कासव प्राणी संग्राहालयातील मुख्य आकर्षण होते. प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी कासवाच्या मृत्यूबाबात शोक व्यक्त केला. दरम्यान, गॅलापागोस कासव अतिशय खास मानले जातात आणि त्यांची उंची ६ फुटांपर्यंत असते. ही कासवे त्यांच्या आकारमानामुळे खूप लोकप्रिय आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top