हॉस्पिटलमध्ये कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्याची गोयल यांची मागणी

मुंबई – मनी लाँडरिंग प्रकरणी अटकेत असलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी रुग्णालयात कुटुंबियांना आपली भेट घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती विशेष न्यायालयाकडे केली आहे. तसेच त्यांनी आपल्याला चोवीस तास सोबत राहणारा एक मदतनीस नेमण्याची परवानगी द्यावी अशी विनंतीही गोयल यांनी केली आहे. यावर न्यायालयाने अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) १५ मार्च रोजी भूमिका स्प्ष्ट करण्यास सांगितले आहे.
विशेष न्यायालयात न्या. एम जी देशपांडे यांच्या न्यायासनासमोर गोयल यांच्या अर्जावर सुनावणी झाली. गोयल हे सध्या पोलिसांच्या पहाऱ्यात रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेत आहेत.कर्करोगाचे निदान झाल्यानंतर गोयल यांनी उपचार घेण्यासाठी अंतरिम जामीन देण्याची मागणी विशेष न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळली. त्यांचा कर्करोग हा प्राथमिक टप्प्यात असून उपचाराने तो बरा होऊ शकतो, असे निरीक्षण त्यांचा जामीन अर्ज फेटाळताना नोंदविले होते. मात्र त्यांना दोन महिने त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली. यापूर्वी त्यांना आपल्या आजारी पत्नीला भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top