१००१ टक्के मलाच उमेदवारी! शिंदेंच्या भेटीनंतर गोडसेंचे वक्तव्य

नाशिक – नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीत अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
मुख्यमंत्रीपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर करूनदेखील गोडसेंचे नाव शिवसेनेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत आले नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शिवाय नाशिकमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत दिसून येत आहेत.

या पार्श्वभूमीवर गोडसे दोन दिवसांपासून शिवसैनिकांसह मुंबईत तळ ठोकून आहेत. आज ते पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चादेखील केली. ‘एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी मिळेल’, असा विश्वास हेमंत गोडसेंनी त्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

काम करत राहण्याचा सल्ला आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असून, आम्ही आपल्या पाठीशी आहोत. लवकरच नाशिक लोकसभेची अधिकृत घोषणा होईल, असे आश्वासनही दिल्याचे गोडसे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top