१४ डिसेंबरपासून राज्यातील परिचारिका बेमुदत संपावर

मुंबई- महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या गुरुवार १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडणार असल्याची शक्यता आहे.
परिचारिका संघटनेने राज्य प्राधिकरण आणि बीजेएमसी आणि ससून रुग्णालयाच्या डीनना पत्र लिहून विविध मागण्या केल्या आहेत.यामध्ये निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षांपर्यंत करावे, या प्रमुख मागणीचा समावेश आहे. तसेच परिचारिका संघटनेने करार संपुष्टात आणून सर्व कंत्राटी नर्सिंग कर्मचार्‍यांना पूर्णवेळ नोकरीत घ्यावे, राज्यभरातील नर्सिंग विभागातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, या मागण्याही करण्यात आल्या आहेत. भरती न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. शिवाय त्यांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. या मागण्यांसाठी सरकारकडे अनेकदा पाठपुरावा केला. त्यासाठी आंदोलने,मोर्चे काढले. तरीही सरकारदरबारी दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आता १४ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे हजारो रुग्णांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top