१५०० कोटींच्या निविदा मागावूनही मुंबईच्या स्वच्छतेकडे कंत्राटदरांची पाठ

मुंबई

मुंबईच्या स्वच्छतेसाठी एकाच कंत्राटदाराची निवड करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने १५ फेब्रुवारी रोजी जागतिक स्तरावर निविदा प्रक्रिया राबवली, मात्र निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्याकरिता ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १५०० कोटींच्या निविदा मागवल्यानंतरही मुंबईच्या स्वच्छतेकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवली आहे.

दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात ६० टक्के मुंबईकर झोपडपट्टीत राहतात. मात्र झोपडपट्टीच्या स्वच्छतेकडे काहीसे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे झोपडपट्टी कचरामुक्तीसाठी स्वतंत्र धोरण राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या धोरणानुसार विशेषतः झोपडपट्टीतील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डम्पिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपवण्यात येणार आहे. यासाठी १५ फेब्रुवारी रोजी निविदा मागवण्यात आल्या, परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्याने ११ मार्च रोजी एक आठवड्याची मुदतवाढ दिली होती. त्यावेळीही प्रतिसाद न मिळाल्याने १८ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतरही कंत्राटदार पुढे न आल्याने २५ मार्चपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ दिली. असे असूनही आता पुन्हा तिसऱ्यांदा निविदा प्रक्रियेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top