२४ तासांत बॅनर्स,पोस्टर्स हटवा नाही तर पोलिसांत तक्रार दाखल

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी शहर आणि दोन्ही उपनगरांत लावण्यात आलेले होर्डिंग्ज,
बॅनर्स,पोस्टर्स २४ तासांत हटवण्याची कारवाई करा, असे निर्देश पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाला दिले.तसेच कोनशिला, नामफलक आदी झाकून टाकावेत आणि आचारसंहितेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, प्रसंगी संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी पालिका आयुक्तांनी काल पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या,निवडणूक आयोगाकडून लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार, पालिकेच्या सर्व विभाग स्तरांवरील सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागात कोणत्याही प्रकारचे विशेषतर्फ राजकीय होर्डिंग्ज,बैनर,पोस्टर दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी हे बॅनर, होर्डिंग काढून टाकल्यानंतर पुन्हा लावले जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी वारंवार पाहणी करावी,असे निर्देशही आयुक्तांनी दिले, प्रसंगी सार्वजनिक मालमत्ता अधिनियमानुसार पोलिसांत तक्रार दाखल करावी, असे निर्देशही आयुक्तांनी दिले. दरम्यान,मुंबई उपनगरांमध्ये मागील दोन दिवसांमध्ये १२,३०० होर्डिंग्ज,पोस्टर्स, बॅनर्स आदी काढण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top