२४ तासांत ३०० पॅलेस्टिनींचा मृत्यू! युद्धात ७,००० दहशतवादी मारले

जेरुसलेम- इस्रायलच्या हल्ल्यात २४ तासांत ३०० पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. ७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत गाझातील १८ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायलने दावा केला आहे की, युद्धात आतापर्यंत ७ हजार हमासचे दहशतवादी मारले गेले. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्झाची हानेग्बी यांनी सांगितले की, ७ ऑक्टोबरपासून गाझामध्ये मारलेले किमान ७ हजार लोक हे हमासचे दहशतवादी होते, त्याचबरोबर इस्रायली लष्कराने गेल्या २४ तासांत हमासचे २४० तळ उद्ध्वस्त केले आहेत.
दरम्यान, हमासने आता ओलिसांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत एकाही ओलिसाला जिवंत सोडणार नाही, असे हमासने काल सांगितले. ओलिसांच्या बदल्यात पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्याची मागणी हमासने केली आहे. २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत सुरु असलेल्या युद्धविरामात २४० पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात १०५ ओलिसांना सोडण्यात आले होते, मात्र हमासच्या ताब्यात अजूनही १३७ ओलीस आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top