२ आणि ३ नोव्हेंबरला मुंबईत पाणीपुरवठा बंद

मुंबई – मुंबईमधील काही भागाxत २ आणि ३ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले. दक्षिण मुंबईमधील केईएम रुग्णालय, टाटा, बाई जेरबाई वाडिया, एमजीएम रुग्णालयात पाणीपुरवठा बंद असणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काही भागांमधील जलवाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या अंतर्गत ९०० मिली मीटर व्यासाचा जलद्वार बदलण्याचे आणि ३०० ते १८०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती करण्यात येणार आहे. गुरुवारी पहाटे ४ वाजल्यापासून ते शुक्रवारी पहाटे ४ वाजेपर्यंत एम (पूर्व), एम (पश्चिम), एन, एल, एफ (दक्षिण) आणि एफ (उत्तर) विभागातील पाणी पुरवठा बंद राहील. मानखुर्द, चेंबुर, घाटकोपर, कुर्ला, टिळक नगर, चुनाभट्टी सायन, माटुंगा, दादर, लालबाग, परळ मधील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top