22 जानेवारीला गोव्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

पणजी
अयोध्येत होणार असलेल्या श्री राम प्राणप्रतिष्ठादिनी 22 जानेवारीला गोवा सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून गोव्यात सर्व सरकारी कार्यालये, शाळा आणि महाविद्यालये यादिवशी बंद राहणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. सरकारी कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनाही प्रतिष्ठापना कार्यक्रमात सहभागी होता यावे, म्हणून गोवा सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली.
अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर 25 जानेवारीपासून इतर भाविकांना दर्शन घेता येणार आहे. राम मंदिराच्या या भव्य कार्यक्रमासाठी देश सज्ज झाला आहे. देशासह गोव्यातही या सोहळ्यामुळे उत्साहाचे वातावरण असून गोव्यात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आहे.दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आणि शाळांना सुट्टी जाहीर केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top