स्कॉटलंडमधील धबधब्यात
दोन भारतीय तरुणांचा मृत्यू
एडिनबर्ग -स्कॉटलंड मधील एका धबधब्यावर फिरायला गेलेल्या दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त स्कॉटलंडच्या स्थानिक वाहिनीने दिले आहे. धबधब्याजवळ फोटो घेताना ही दुर्घटना घडली. चाणक्य बोलिसेट्टी व जितेंद्रनाथ कारुटुरी अशी या तरुणांची नावे असून हे दोघे स्कॉटलंडमधील डुंडी विद्यापीठात शिक्षण घेत होते.
हे दोन्ही तरुण बुधवारी टुम्मेल धबधब्याच्या डोंगरावर पर्वतारोहणासाठी गेले होते. यावेळी धबधब्याजवळ फोटो घेताना ते तोल जाऊन धबधब्यात पडले. हे दोघे विद्यार्थी डुंडी विद्यापीठात डाटा सायन्स मध्ये मास्टर्सच्या पदवीचा अभ्यास करत होते. या दोघांचे मृतदेह मिळाले असल्याची माहिती स्कॉटलंडच्या पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top