आज फास्टॅगसाठी पेटीएमचा वापर करण्याचा शेवटचा दिवस

नवी दिल्ली- पेटीएम पेमेंट्स बँकेचे सर्व बॅंकिंग व्यवहार उद्या १५ नंतर म्हणजेच १६ मार्चपासून बंद होणार आहेत. त्यामुळे लाखो लोकांचा पेटीएम फास्टॅग खाते वापरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे.दरम्यान,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅगसाठी ३९ बँकांची यादी जारी केली आहे. त्यात पेटीएमचे नाव नाही.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फेब्रुवारी महिन्यात ३२ बँकांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता ३९ बँकांची सुधारित यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात पेटीएमच्या नावाचा समावेश नाही. रिझर्व्ह बॅंकेने पेटीएमला आधी २९ फेब्रुवारी आणि नंतर १५ मार्चनंतर सर्व बॅंकिंग व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे पेटीएमशी फास्टॅग खाते असणार्‍या वाहनधारकांना हे खाते बंद करून ते इतर बँकांशी लिंक करावे लागणार आहे.त्याने असे न केल्यास त्याचे खाते आपोआप निष्क्रिय होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top