काँग्रेस उमेदवारांची सहावी यादी जाहीर

नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज आपली सहावी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाही. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील १२ उमेदवारांच्या नावांची काँग्रेसकडून घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने आतापर्यंत ५ याद्यांमधून १८६ उमेदवार जाहीर केले होते. आता, काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली असून राजस्थानमधील ४ आणि तामिळनाडूतील एका उमेदवाराच्या नावांची घोषणा या यादीतून करण्यात आली आहे. अजमेर, राजसमंद, भिलवाडा, कोटा आणि तामिळनाडूतून तिरुनेलव्हेली या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अजमेरमधून रामचंद्र चौधरी तर कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top