कोटातील वसतिगृहाला आग गोंधळात ८ विद्यार्थी जखमी

कोटा
राजस्थानमधील कोटा येथील कुन्हडी भागातील वसतिगृहात तळमजल्यावर असलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना आज सकाळी ६ वाजता घडली. या आगीत 7 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले तर पायऱ्यांवरुन उतरत असताना एका विद्यार्थीचा पाय घसरला. त्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला.
या घटनेच्या वेळी ६ मजली वसतिगृहात ७० विद्यार्थी होते. सकाळी बहुतांश विद्यार्थी गाढ झोपेत होते. आगीने उग्र रूप धारण केल्यानंतर वसतिगृहात प्रचंड गोंधळ उडाला. पहिल्या मजल्यावरील काही विद्यार्थ्यांनी बाल्कनीला चादर बांधून खाली उतरले तर काही विद्यार्थ्यांनी बाल्कनीतून उडी मारली. वसतिगृहातून बाहेर पडताना विद्यार्थ्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यात एक विद्यार्थी पायऱ्यांवर घसरल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. अर्पित पांडे असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. अर्पितवर एमबीएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेचे सीएफओ राकेश व्यास म्हणाले की, आगीची माहिती मिळताच कुन्हडी पोलीस ठाणे आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर काही तासांनी ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली. यातील १ विद्यार्थ्यांच्या पायाला दुखापत झाली तर 7 विद्यार्थी किरकोळ भाजले. चार विद्यार्थ्यांना उपचारासाठी एमबीएस रुग्णालयात पाठवण्यात आले. उर्वरित मुलांचे तेथे समुपदेशन करण्यात आले. त्यांना अन्य ठिकाणी हलवण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top