जालन्यात भरदिवसा गोळीबार! एकाचा मृत्यू

जालना- जालना जिल्ह्यातील मंठा चौफुली भागात आज तीन अज्ञात व्यक्तींकडून भरदिवसा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात गजानन तौर याचा जागीच मृत्यू झाला. गजानन चौर हे माजी मंत्री अर्जून खोतकर यांचे कट्टर समर्थक होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तौर याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या ३ अज्ञात आरोपींनी गजानन तौर याच्यावर गोळीबार केला. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार शहरात विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलिसांना एक चाकूदेखील आढळून आला. गजानन याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top