पुढील ४ दिवस कडक उष्णतेचे! राज्यातील तापमान चाळिशीपार

मुंबई- सध्या विदर्भ, मराठवाडा,उत्तर महाराष्ट्रात हवेच्या वरच्या थरात चक्रावाताची स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्याला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागत आहे.पुढील चार दिवस तर कडक उष्णतेचे राहणार असून तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.दरम्यान, तेलंगणा,कर्नाटक, तामिळनाडू व केरळातही मोठी तापमान वाढ होणार आहे.
राज्यात तापमानाचा पारा सातत्याने वर चढत आहे. आता तापमानात कमाल वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अनेक ठिकाणी तापमान चाळीस अंशांच्या वर जात आहे.मार्च महिन्यातच कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. सोमवारी २५ मार्च रोजी तर मालेगाव येथे ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. परंतु राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तिवली जात आहे.केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या दक्षिण किनारपट्टीवरही उन्हाचे चटके बसण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top